सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेयांनी अपक्ष उमेदवार महेश कोठे आणि एमआयएमचे फारुक शाब्दी यांचा पराभव झाला आहे. या उमेदवारमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली, प्रणिती शिंदे या पहिल्या फेरीत आघाडीवर असताना त्यानंतर त्या पिछाडीवर पडल्या यामुळे शेवट्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांना आपली हॅट्रिक पूर्ण करता येईल की नाही अशी चिंता होती. फारुक शाब्दी यांनी 10 फेरीत त्यांना 9 हजार 523 मतांनी जोरदार कडवी झुंज देत होते तर शिवसेनेचे दिलीप माने हे देखील 3 हजार मतांनी प्रणिती शिंदेंना पिछाडीवर सोडून आघाडीवर होते. प्रणिती शिंदे या 4 हजार मतांना पिछाडीवर होत्या.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात उभ्या होत्या. प्रणिती शिंदे यांना ४६०४६ मिळाली तर फारुक शाब्दी यांना ३४४०८ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदेनी जोरदार लढत आपला विजय मिळवला आहे. दरम्यान शिवसेनेचे दिलीप माने आणि अपक्ष महेश कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्यात जोरदार लढत चाली होती. मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत.