मुक्ताईनगर : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभेतील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. रोहिणी खडसे या भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवत होत्या. मात्र त्यांचा २३२८ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे विजयी झाले आहेत. रोहिणी खडसे यांना ८५,७६५ मते मिळाली तर अपक्ष चंद्रकांत पाटील हे ८८,०९३ मते मिळून विजयी झाले आहेत.
दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथ खडसे यांना उमेदवारी न दिल्यामुळं हा पराभव झाल्याचे म्हंटले जात आहे. भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली होती. मात्र तरीही भाजपच्या वाट्याला अपयश आले. त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी यांना टक्कर देत विजय मिळविला. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
दरम्यान, रोहिणी यांच्या पराभवानंतर एकनाथ यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले कि, जनमताचा निर्णय मान्य करावं लागेल, पराभवाची कारण शोधावी लागतील, तरी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून रोहिणी सदैव जनतेच्या हिताची कामे करतील.’
Visit : bahujannama.com