बहुजननामा ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुसाठीची मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यात महत्वपूर्ण लढतीतील एक असणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे सध्या 11000 मतांनी पिछाडीवर असून शिवसेनेचे दिलीप माने हे आघाडी आहेत.
बहुरंगी लढत असणाऱ्या या मतदार संघात अपक्ष महेश कोठे , एमआयएम पक्षाचे फारुख शाब्दी हे उमेदवार देखील निवडणूक लढवत होते.मतमोजणीच्या पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे २४०० मतांनी आघाडीवर होत्या, तर फारुख शाब्दी १८०० तर दिलीप माने यांना १६०० मत आणि अपक्ष महेश कोठे यांना १५०० मत पडली होती.
मात्र मोजणीच्या तिसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे या पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत, त्यामुळे प्रणिती या विजयाचा षटकार मारणार कि दिलीप माने याठिकाणी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत
Visit : bahujannama.com