सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ टिकवण्यासाठी या वेळेस मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या मतदारसंघातील लढत शिवसेनेचा उमेदवार कोण असेल यावर ठरणार आहे. कारण भाजप शिवसेना युती नंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे असेल.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून नाराज होत शिवसेनेत गेलेल्या महेश कोठे यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना चौरंगी लढत द्यावी लागली होती. यावेळेसही अशीच परिस्थिती आहे.
या मतदारसंघातून दिलीप माने निवडणूक लढवतील असे जलसंधारम मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यामुळे महेश कोठे यांची अडचण झाली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे. युतीनंतर प्रणिती शिंदे यांचा संघर्ष वाढणार आहे. मुलीच्या प्रेमाखातर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघातून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
आगामी निवडणुकीतील सभाव्य प्रतिस्पर्धी
-नरसय्या आडम(माकप)
-दिलीप माने(शिवसेना)
-तौफिक शेख(एमआयएम)
-पांडुरंग दिड्डी(भाजप)
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत