तेलंगणा : वृत्तसंस्था – विविध मुद्यांवरुन महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Political News) तापले आहे. तर दुसरीकडे राज्यात बीआरएस (BRS) ने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrasekhar Rao) यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आणले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तेलंगणात दाखल झाले असून भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://www.facebook.com/photo?fbid=3043417202633322&set=pcb.3043417249299984
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण हैदराबाद येथे होणार आहे. या कार्यक्रमसाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हैदराबादमध्ये आले आहेत. असे असले तरी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाकडून महाराष्ट्रात पुढील निवडणूका समोर ठेवून या राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत (Shivsena) युती केली आहे. सेनेसोबत युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने वंचित बहुजन आघाडीला अद्याप स्विकारले नाही. त्यामुळे हा वाद कायम असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar met telangana chief minister k chandrasekhar
हे देखील वाचा :