पुणे : बहुजननामा ऑनलाईन – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद एकदिवसीय (५० षटके) क्रिकेट स्पर्धेत (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament) शाम यादव याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिंहगड इलेव्हन संघाने सिंधुदूर्ग इलेव्हन संघाचा ३ गडी राखून पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)
सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सिंधुदूर्ग इलेव्हन संघाचा डाव ३०.१ षटकात १३७ धावांवर मर्यादित राहीला. सिंधुदूर्ग संघाचे फलंदाज शाम यादव याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये सापडले. शाम याने ३९ धावात ५ गडी बाद करून निम्मा संघ तंबुत पाठवले. प्रदीप सी. ५२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. ओंकार पेटकर याने २८ धावांचे योगदान दिले. सिंहगडच्या स्वप्निल ए. याने ४७ धावात तीन गडी बाद केले.
विकास सहानी याने २२ धावात २ गडी टिपले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सिंहगड इलेव्हन संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरेख सुरूवात केली. हेमंत वाईकर याने २७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. शिवम सॉ याने ३२ धावांची खेळी केली. या दोघांनी ९ षटकांमध्ये ८३ धावांची झटपट सलामी देत विजयाचा पाया रचला. शाम यादव याने नाबाद ३१ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला. सिंहगड संघाने हे आव्हान १९ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले आणि स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सिंधुदूर्ग इलेव्हनः ३०.१ षटकात १० गडी बाद १३७ धावा (ओंकार पेटकर २८, प्रदीप सी. ५६ (५२, २ चौकार, ६ षटकार),
शाम यादव ५-३९, स्वप्निल ए. ३-४७, विकास सहानी २-२२) पराभूत वि. सिंहगड इलेव्हनः १९ षटकात ७ गडी बाद १४०
धावा (हेमंत वाईकर ५७ (२७, ६ चौकार, ४ षटकार), शिवम सॉ ३२, शाम यादव नाबाद ३१, ओंकार मोगलगिद्दीकर ४-४६,
प्रदीप ३-६२); सामनावीरः शाम यादव;
Web Title :- Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Cricket Tournament; Sinhagad XI winning four!!
हे देखील वाचा :
Satyashodhak Marathi Movie | ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टीझरचे शरद पवार यांच्याकडून कौतुक