पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी (Crime Against Woman) देवून संसार उध्दवस्त करण्याची भाषा करणार्याविरूध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
हेमंत संजय वैराट (Hemant Sanjay Vairat) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हेमंत वैराटने फिर्यादीसोबतच्या प्रेमसंबंधाचा (Love Affair) फायदा घेतला. त्याने फिर्यादीच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीला सन 2018 ते दि. 11 एप्रिल 2023 दरम्यान वेळावेळी परिसरात बोलावून घेवुन कारमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नंतर फिर्यादीने आरोपीस भेटण्यास दिला असता आरोपीने अश्लील फोटो फिर्यादीच्या पतीला दाखविण्याची धमकी देत संसार उध्दवस्त करण्याची भाषा केली आणि फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवुन त्यांच्या घरात जावुन माझा फोन का उचलत नाही असे म्हणून त्यांच्यासोबत जबरदस्ती केली. मला भेटायला न आल्यास मी बघतो काय करायचे ते पाहतो अशी धमकी हेमंत संजय वैराटने फिर्यादीला दिली. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Parvati: Threatening to show obscene photos to husband, case against one for raping 26-year-old woman
हे देखील वाचा :