मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत महत्वाच्या विषयावर भाष्य करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल.
येत्या काही दिवसांवर विधानसभा येऊन ठेपलेली असताना सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेत दबदबा निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत ‘वंचित’चे सर्वेसर्वा सध्याची राजकीय परिस्थिती, EVM च्या तक्रारीबाबत तसेच ‘वंचित’ची संघटनात्मक बांधणी व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीबाबत आताच आपले पत्ते खुले करणार नाही. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू, त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू, पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हंटले होते.