सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज दाखल करताना उमेदवारांनी पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आंबेडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती दाखवली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांच्या कुटुंबाच्या नावे ६ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती दाखवली आहे. यातील ३ कोटी १५ लाखांची मालमत्ता वारसाहक्काने मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे १ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावे गडचिरोली जिल्ह्यातील मुडसा येथे जमीन आहे. मुलगा सुजातच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे येथे आणि पत्नीच्या नावे वेल्हा तालुक्यातील ओसडे येथे जमीन आहे.
प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता
(प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर, आणि मुलगा सुजात आंबेडकर)
करप्राप्त उत्पन्न
आर्थिक वर्ष २०१४-१५
प्रकाश आंबेडकर -१लाख ६१ हजार१००रुपये
अंजली आंबेडकर – १२ लाख ९५ हजार ६० रुपये
आर्थिक वर्ष २०१८-१९
प्रकाश आंबेडकर -८ लाख ६० हजार १९० रुपये
अंजली आंबेडकर – २१ लाख ०९ हजार १४० रुपये
जंगम मालमत्ता
प्रकाश आंबेडकर – ४१ लाख ८१ हजार १८९रुपये
अंजली आंबेडकर -७३लाख८६ हजार २७३ रुपये
सुजात आंबेडकर -९ लाख ५५ हजार ४५४ रुपये
स्थावर मालमत्ता
प्रकाश आंबेडकर – ३२लाख
अंजली आंबेडकर – १ कोटी १५ लाख
संयुक्त – ३ कोटी १५ लाख