सोलापूर बहुजनानामा ऑनलाईन – देशात राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काल (सोमवार दि .२५ )आपला उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जनसमुदायाने प्रचंडगर्दी करत जणू आपला विजय निश्चित आहे बाळासाहेब असेच सूचित करत होते.
गर्दी इतकी झाली होती कि प्रकाश आंबेडकरांना मोटारसायकलवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला
वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांनी पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं. तर महायुतीने सोलापुरातील हेरिटेज हॉल इथे मेळावा घेत कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला. सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.आधी काँग्रेस आणि भाजप मध्ये होणारी ही लढत प्रकाश आंबेडकरांच्या शिरकावामुळे तिरंगी होणार आहे.