नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून काँग्रेस कडून अशोक चव्हाण यांच नाव घोषित झाले त्यांनी काल उमेदवारी फॉर्म सुद्धा भरला त्याच बरोबर त्यांनी डमी फॉर्म म्हणून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचा फॉर्म सोबत भरला आहे .फॉर्म भरल्या नंतर त्यांनी आपली एकूण संपत्ती प्रशासनास कळविली आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांची संपत्ती, दाखल गुन्हे यासह सर्व माहिती जाहीर केली.अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद २२ महिने भूषवलं आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. खासदारकीची धुरा अशोक चव्हाण यांनी सांभाळली होती .त्यांचे वडील शंकरराव चव्हाणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपत्ती किती याबाबत उत्सुकता लोकांची एकण्यासाठी असणारच
अशोक चव्हाण यांची संपत्ती
बँकेत रोख – ७९ लाख ४२हजार २८३रुपये
बँकेत मुदत ठेव – ८०लाख ७४ हजार ६३५
शेअर्स – ४३ हजार १७६
दाग-दागिने – ४९ लाख ३९ हजार ३४०
कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – २०कोटी ६६ लाख ३९ हजार २४०
वाहने – महिंद्रा गुडस करिअर ( एकूण ४ गाड्या )
सौ अमिता चव्हाण संपत्ती
बँकेत रोख – ४६ लाख ३४ हजार ७९
शेअर्स –१ लाख ३९ हजार ४९५ रुपये
दागिने- १ कोटी ४३ लाख ५१ हजार ५८४
कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – ११ कोटी ५१ लाख १० हजार २१९
वाहने
१) ट्रॅक्टरची ट्रॉली
२)बजाज ट्रॅक्टर
३)फॉर्च्युनर कार