बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह या पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडण्या आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणणे प्रज्ञा सिंह यांच्या अंगलटी आले असून संरक्षण सल्लागार समितीवरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजप पक्षाने प्रज्ञा यांच्या या भूमिकेचा निषेध दर्शवत त्यांना या पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरु असताना प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणून संबोधले. त्यामुळे लोकसभेत एकच गोंधळ उडाला. त्यांच्या या व्यक्तव्याचा व्हीडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्स त्यांच्या या भूमकेचा निषध व्यक्त करत असल्याने भाजपला हा धोका परवडण्याजोगा नसल्याने भाजपने हा निर्णय घेतला.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला असून संरक्षण सल्लागार समितीवरून प्रज्ञा यांची हकालपट्टी करण्यात अली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या खासदारांच्या बैठकींतही त्यांना वगळण्यात आले.
Visit : bahujannama.com