मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे आज राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल. या शपथविधी सोहळ्यात फक्त उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की त्यांच्यासह आणखी कोणी मंत्रिपदाची शपथ घेणार यावर साशंकता होती. परंतू ती आता दूर झाली आहे. छगन भुजबळांनी यावर पडदा टाकला आहे.छगन भुजबळ यांनी आज उद्धव ठाकरेंबरोबर आणखी कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ यांनी सांगितले की आज ते स्वत: उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. याशिवाय आणखी एक आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल.
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्या राष्ट्रवादीचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यापैकी मी एक असेल असे भुजबळांनी स्पष्ट केले परंतू दुसरा आमदार कोण असेल जो शपथ घेणार आहे हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. आणखी विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि आणखी एक आमदार मंत्रिपदाची शपथ तर घेतील परंतू कोणत्या मंत्रिपदाची ते शपथ घेणार हे स्पष्ट झालेले नाही.
परंतू छगन भुजबळ यांच्यासह आज शिवतीर्थावर जयंत पाटील देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असेल तरी उपमुख्यमंत्री कोण यावर अजून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सुरुवातीला जयंत पाटलांची उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होती परंतू आता चर्चा आहे ती अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत. परंतू आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली जाणार नाही.
Visit : bahujannama.com