बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात महिनाभर सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यावर अखेर संपले असून महाविकासआघाडी राज्यात सरकार स्थापन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर राज्याच्या २९व्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. त्यामुळे राज्यात शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहेत.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने शिवसेना भवन या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी आणि सोबतच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीचे पोस्टर झळकले आहेत. तर या महाविकासआघाडीच्या स्वागतासाठी दादर या ठिकाणी काँग्रेसकडूनही मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये शरद पवारांसहित उद्धव ठाकरे तसेच सोनिया गांधी यांचेही फ्लेक्स झळकले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एच डी देवेगौडा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजबचे कॅप्टन अमरेंद्र सिंह, ममता बॅनर्जी तसेच इतर राज्यातील अनेक दिग्गज नेते हजार राहणार आहेत.
Mumbai: Hoardings welcoming the new government in #Maharashtra and party flags of Shiv Sena & Congress seen on the stretch from Dadar TT to Shivaji Park. The new state govt, led by Shiv Sena chief & 'Maha Vikas Aghadi' leader Uddhav Thackeray as the CM, will be sworn in today. pic.twitter.com/aegYvgxmbK
— ANI (@ANI) November 28, 2019
तसेच राज्यातील ४०० शेतकऱ्यांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित देण्यात आले आहे. तर ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे सांगलीच्या एका शेतकऱ्याने शपथविधीसाठी आम्हालाही बोलवा अशी विनंती केली होती त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील आजचा हा शपथविधी सोहळा मोठा ऐतिहासिक असणार आहे.
Visit : bahujannama.com