बहुजननामा ऑनलाईन टीम – तुम्ही नेहमी गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या स्कीमच्या शोधात असता. गुंतवणूकीत जास्त परतावा मिळावा असेही तुम्हाला वाटते तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम (MIS) मध्ये गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हांला दरमहा चांगला परतावा मिळू शकतो . या योजनेचा भाग होण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये कमीत कमी १५०० रुपये भरून खाते सुरु करावे लागेल . या योजनेत तुम्ही ५ वर्ष गुंतवणूक करू शकता, याशिवाय पुढील ५ वर्षासाठी गुंतवणूक वाढवू ही शकता.
या योजनेमध्ये तुम्ही जर एकदा पैसे गुंतवले की दरमहा तुम्हांला ठरलेले इनकम सुरु होते. ही योजना गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो, यामध्ये महत्त्वाचे ५ फायदे आहेत.
– कोणीही या योजनेत आपले खाते सुरु करू शकतो.
– जमा केलेली रक्कम कायम सुरक्षित राहते.
– इतर गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो.
– या गुंतवणुकीतून दरमहा निश्चित परतावा मिळतो.
– योजनेच्या शेवटी तुम्हाला तुमची पूर्ण रक्कम परत मिळते. या मिळालेल्या रक्कमेतून तुम्ही याच योजनेत पुन्हा गुंतवणूक करू शकता.
किती गुंतवणूक करू शकतो
हे खाते जर सिंगल असेल तर तुम्ही यात ४. लाखापर्यंत रक्कम जमा करू शकता. तेच जर हे ज्वाइंट खाते असल्यास तुम्ही ९ लाखापर्यंत रक्कम जमा करू शकता.
कोण गुंतवणूक करू शकतात
कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. जर मुलगा किंवा मुलगी १० वर्षपेक्षा कमी वयाचे असतील तर त्यासाठी आई वडील हे लीगल गार्डियन म्हणून त्यांच्या नावे खाते सुरु करू शकतात.
खाते सुरु करण्यासाठी लागेल या कागद पत्रांची गरज
कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते सुरु करू शकता. यासाठी २ फोटो, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड यातील कोणतेही एक कागद पत्र जोडू शकता. याशिवाय तुम्हाला एक एड्रेस प्रुफ दाखवावा लागेल.
असा मिळेल दर महिन्याला फायदा
७. ६ टक्के व्याज वर्षाला मिळेल. या वार्षिक व्याजाला १२ महिन्यात वाटले जाते. जे तुम्हाला मंथली बेसिस वर मिळेल. जर तुम्ही ९ लाख रुपये जमा कराल तर तुम्हाला वार्षिक व्याज जवळपास ६८,४०० रुपये मिळेल. म्हणजेच दरमहा तुम्हाला ५७०० रुपये परतावा मिळेल.