मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या खोट्या दाव्यांमुळे आणि चुकीच्या विधानामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी काश्मीर मुद्यावर एक दावा केला आहे. ज्यामुळे जगभरात त्यांच्यावर टीका होत आहे. ट्रंप यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना काश्मीर प्रकरणी मध्यस्थी करण्यास विनंती केली होती. ट्रंप यांनी केलेल्या दाव्यावर व्हाइट हाउसला देखील स्पष्टीकरण द्यावे लागले. ट्रंप यांनी केलेला दावा भारताने खोटा असल्याचे सांगितले.
डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर ८,१५८ वेळा खोटे बोलून फसवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी एका अमेरिकेतील वृत्तपत्राने यासंबंधीची रिपोर्ट प्रकाशित केला होता. अनेक मिडिया रिपोर्ट आणि वृत्तपत्राच्या अहवालानुसार ही माहिती मिळाली आहे. दुसऱ्याच वर्षी त्यांनी तीनपट वेगाने जवळ-जवळ १७ खोटे दावे केले.
वृत्तपत्राने आपल्या अहवालात ‘फॅक्ट चेकर’ च्या आकड्यांचा अहवाल दिला आहे. हा ‘फॅक्ट चेकर’ राष्ट्रपतीने दिलेल्या संशयित विधानांचे विश्लेषण आहे. ‘फॅक्ट चेकर’ च्या आकड्यांचा माहितीनुसार, राष्ट्रपती बनल्यापासून ते आता पर्यंत ८,१५८ वेळा खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केले आहेत. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, गेल्या २ वर्षांत केलेल्या ६,००० पेक्षा आधिक आश्चर्य कारक दाव्याचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ट्रंप यांनी सगळ्यात जास्त दिशाभूल करणारे दावे इमिग्रेशनला घेऊन केले आहेत. या वेळी त्यांनी आतापर्यंत १,४३३ दावे केले आहेत. ज्यात तीन आठवड्यात केल्या गेलेल्या ३०० दाव्यांचा समावेश आहे.