लोणावळा : बहुजननामा ऑनलाइन – लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर सुरु असलेल्या एका जुगार आड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 12 महिला आणि 60 पुरुष असे एकूण 72 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण गुजरातमधील व्यापारी आणि उद्योगपती असल्याचे समजतय. ही कारवाई सोमवारी (दि.7) रात्री करण्यात आली. खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, रिसॉर्टमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये जुगार अड्डा सुरु होता. काहीजण पत्ते खेळत होते ज्यासाठी रोख रक्कम आणि जुगारात वापरण्यात येणाऱ्या चिप्सचाही समावेश होता. या कारावाईत आम्ही 72 जणांना अटक केली असुन यामध्ये 60 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले काही जण हे गुजरातमधील व्यापारी आणि उद्योगपती असून त्यांनी रिसॉर्टमध्ये महिला वेटर्सनाही बोलावलं होतं.
अटक करण्यात आलेल्या 72 जणासोबत रिसॉर्टचा मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगारविरोधी कायदा व साथीचे रोग कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले गुजतरामधील व्यापारी खास या पार्टीसाठी विमानाने आणि खास गाडी करुन लोणावळ्यात आले होते. या कारवाईमध्ये पोलिसांनी 3 लाख रुपये रोख आणि 40 लाख रुपये किमतीच्या गँबलिंक चिप्स असा मुद्देमाल जप्त केला आहे.