मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईतील गोवंडी भागात घरी जाण्यास सांगितल्याने चौघांना एका पोलिसाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांनी रस्त्यावर फिरणार्या विरोधात अधिक कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.
गोवंडी परिसरात रस्त्यावर घोळका करुन उभ्या असलेल्या तरुणांना गस्त घालत असलेल्या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा चौघा जणांनी एका पोलीस कर्मचार्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाजिद शेख आणि सलमान अशा दोघांना अटक केली आहे. दोघे जण फरार झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लोकांना त्याचे गांभीर्य अजून समजून घेत नाहीत. जीवाचा धोका असतानाही पोलीस रस्त्यावर असताना त्यांच्यावरच हल्ले होण्याचे प्रकार गंभीर आहेत.