पुणे : बहुजननामा – जगभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी चिंचवड करांसाठी आजची सकाळ दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील आणखी एका कोरोना बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज त्यांचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. महापालिकेने तातडीने केलेली कारवाई, घरोघरी जाऊन केलेल्या तपासण्या यामुळे पिंपरीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे.
आज निगेटिव्ह अहवाल आलेला कोरोना बाधिताचा भाऊ फिलिपाईन्सहून आला होता. त्यापासून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा क्वारंटाईनचे १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पुन्हा नमूना घेण्यात आला. तो निगेटिव्ह आला. आता दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील १४ पैकी ११ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील १२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. २० मार्च ते १ एप्रिल या १३ दिवसात एकही कोरोना बाधित आढळून आला नाही. त्यातील बरे झालेल्या १० जणांना घरी सोडण्यात आले आहे. केवळ दोनच व्यक्तींवर उपचार सुरु होते. त्यातील एक जण आता कोरोना मुक्त झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील २३ भाविक दिल्लीतील निजामुद्दीनला गेले होते. तसेच त्यांच्याशी संपर्कात आलेल्या ५ जणांसह २८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार करण्यात आले आहे. इतरांना होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आली आहे.