पुणे : बहुजननामा ऑनलाईन – PMPML Strike | पीएमपीएमएलच्या बस ठेकेदारांनी अचानकपणे पुकारलेल्या संपा संदर्भात (PMPML Strike) पीएमपीएल चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांची सोमवारी (दि.6) भारतीय जनता पार्टी (BJP) पुणे शहराच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (City President Jagdish Mulik) यांनी पीएमपीएमएलची सेवा पुर्ववत करावी अशी मागणी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जगदीश मुळीक म्हणाले, सध्या १० वी (SSC Exam) आणि १२ वी च्या (HSC Exam) परीक्षा चालू आहेत. अशावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसचा वापर करतात, अशा परिस्थिती मध्ये जर संप पुकारला गेला तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे होईल. पुणेकर नागरिकांचे हाल भारतीय जनता पार्टी कदापी सहन करणार नाही. त्यामुळे बससेवा पूर्ववत करण्यात यावी तसेच बेकायदेशीर संप (PMPML Strike) पुकारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जगदिश मुळीक यांनी यावेळी बकोरियांकडे केली. शिवाय पुन्हा असा प्रकार होऊन पुणेकरांची ससेहोलपट होऊ नये, असेही यावेळी ओमप्रकाश बकोरि यांना सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सरचिटणीस गणेश घोष, संदीप लोणकर, सुशिल मेंगडे,
धनंजय जाधव, विकास लवटे, संतोष राजगुरु, हरीश निकम, शैलेश राजगुरु,
विक्रम निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title :- PMPML Strike | The service of PMPML should be restored, BJP city president Jagdish Mulik demand
हे देखील वाचा :
Nashik ACB Trap | 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)
Pune Water Supply | गुरुवारी शहरातील आंबेगाव पठार भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार