पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारकडून (Central Government) मागील आठ वर्षात सतत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ केली जात आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) कार्यालयाच्या बाहेर महागाईचा रावण तयार करुन होळी (Holi) करण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची सुबुद्धी दे अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (Pune NCP) दिल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, सतत होणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे महागाई मधून बाहेर काढता येईल याकडे सरकारचे लक्ष नाही. हे राज्यातील जनतेला माहिती असून जनता यांना चांगला धडा शिकवणार आहे, असल्याचे जगताप म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला महागाई कमी करण्याची बुद्धी द्यावी,
अशी प्रर्थना आजच्या होळीच्या निमित्ताने देवाकडे केली असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
Web Title :- Pune NCP | NCP’s Holi in Pune to protest central government against inflation
हे देखील वाचा :
Pune Water Supply | गुरुवारी शहरातील आंबेगाव पठार भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी
Lingayat Samaj | महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन