पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Lingayat Samaj | महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता (Mahatma Basaveshwar Samajk Samta-Shiva Award) जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १० दिवसाच्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. (Lingayat Samaj)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वीरशैव लिंगायत समाजासाठी (Veerashaiva Lingayat Samaj) सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने व्यक्तीसाठी १ व सामाजिक संस्थांसाठी १ असे एकूण २ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांचे वितरण २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशी होणार आहे. (Lingayat Samaj)
व्यक्तीगत पुरस्कारासाठी:
अर्जदार हे वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवक असावेत. वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी ५० वर्षे व महिलांसाठी ४० वर्षे अशी आहे. पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, दहावी बोर्ड प्रमाणपत्र व जातीचा दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
संस्थेसाठी पुरस्कार:
अर्जदार संस्था ही वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी तसेच कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी असावी. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अभिलेखे, पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अर्जदारांनी आपले अर्ज सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा,
पुणे ४११००६ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे उद्यापासून १० दिवसाच्या मुदतीत सायं ५.३० वाजेपर्यंत
सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
Web Title :- Lingayat Samaj | Mahatma Basaveshwar Samajk Samta-Shiva Award Puraskar Call to Apply
हे देखील वाचा :
Ajit Pawar | येत्या काळात काही आमदार घरवापसी करतील; अजित पवारांनी दिले राजकीय उलथापालथीचे संकेत