नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी narendramodi_in चे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने ट्विटर अकाऊंट हॅक करुन पीएम केअर फंडासाठी बिटकॉइन दान करण्याची देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर हॅकरने हे ट्विट डिलीट केलं आहे.
गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. जॉन विक (hckindia@tutanota.com) या अकाऊंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केलंय. त्याने ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, ‘कोविड-१९ साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास मागणी करतो’. तथापि, आता हे ट्विट डिलीट करण्यात आलं असून, आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे. तसेच आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. आणखी कोणती अकाऊंट हॅक झाली का ? याबद्दल अधिक माहिती नसल्याचं ट्विटरकडून म्हटलं आहे.
काय आहे बिटकॉइन ?
बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन असून हे डॉलर, रुपये अथवा पौंड सारख्या इतर चलनांमध्ये देखील वापरलं जात. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकते. हे चलन २००९ मध्ये बिटकॉइनच्या स्वरुपात वापरात आलेलं. आज याचा जगातिक चलनासाठी वापर करण्यात येतो.
दरम्यान, यापूर्वी सुद्धा अनेक दिग्गज लोकांचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत आणि गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच आयफोनच्या निर्माता Apple ही हॅकर्सच्या कचाट्यात सापडली होती. त्यावेळी सुद्धा हॅकर्सनी बिटकॉइन ची मागणी केलेली.