जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यात ते स्टेजवर सन्मान घेताना एका कार्यकर्त्याला हाताच्या कोपऱ्याने बाजूला ढकलताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पवारांच्या या व्हिडीओचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. मोदींची महाराष्ट्रात आज पहिली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. जळगाव तसेच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
https://twitter.com/Sapnameratootg1/status/1183034880113856512
एवढ्या मोठ्या नेत्याला साधा कार्यकर्ता सहन झाला नाही. ज्या पक्षाच्या अध्यक्षाला कार्यकर्ता नको आहे त्या पक्षाचं काय होणार असं म्हणत मोदींनी नाव न घेता पवारांवर निशाणा साधला. पवारांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, स्टेजवर शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी त्यांना हार घालण्यात येत होता. त्यावेळी एक कार्यकर्ता हारात सहभागी होत पुढे आला आणि त्याने सर्वांना नमस्कार केला. त्यावेळी शरद पवारांनी आपल्या हाताच्या कोपऱ्याने त्याला मागे ढकलले.
https://twitter.com/rose_k01/status/1182547134387589120
Visit : bahujannama.com