Mercedes-Maybach S650 Guard VR10 –
ही लक्झरी कार मर्सिडीजची लेटेस्ट कार आहे, ज्यामध्ये लेव्हल प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये (PM Modi’s New Bulletproof Car) इतर कारच्या तुलनेत जास्त प्रोटेक्शन लेव्हल आहे. मर्सिडीज-मेबॅक ची खासियत म्हणजे त्याची संरक्षण यंत्रणा. वृत्तानुसार Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard ला 10.5 कोटी रुपयेला लाँच केले होते आणि Mercedes-Maybach S650 ची किंमत 12 कोटी रुपयेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अत्याधुनिक सुविधा –
Mercedes-Maybach S650 Guard कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. मर्सिडीज-मेबॅक कारची बॉडी आणि खिडक्या कोणत्याही बुलेट किंवा बॉम्ब पासून सरंक्षण करतात. अतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने, याला 2010 एक्स्प्लोजन प्रूफ व्हेईकल (ERV) रेटिंग मिळाले आहे आणि गाडीतील लोक केवळ 2 मीटर अंतरावरुन 15kg TNT स्फोटापासून देखील संरक्षित राहतील. या गाडीला चारही बाजूंनी संरक्षण मिळावे यासाठी खूप नियोजन करून ती तयार करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, गॅस हल्ला झाल्यास सुरक्षा देणे, दारुगोळ्यासह हल्ला झाल्यास सुरक्षा देणे इ.
या कारची इंधन टाकी एका विशिष्ट सामग्रीने बनवलेली आहे जे आदळल्या नंतर आपोआप छिद्र सील करते. बोईंग त्याच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टर साठी वापरते त्याच सामग्रीपासून ते तयार केले आहे. हे स्पेशल रन-फ्लॅट टायर्सवर देखील चालते जे टायर्स खराब झाल्यास किंवा सपाट होण्याच्या स्थितीत चालू राहतात, ज्यामुळे त्वरित सुटका सुनिश्चित होते.
इंजिन
Mercedes-Maybach S650 Guard मध्ये 6.0-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन दिलेले आहे जे 516bhp आणि सुमारे 900Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर त्याची वेग मर्यादा 160 किमी प्रतितास आहे.
Web Title :- PM Modi’s New Bulletproof Car | PM modi gets bulletproof car maybach 650 guard pm modi yanchi navin bulletproff car
Gold Price Today | आज पुन्हा महागले सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा काय आहे दर