नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | आज आठवड्याच्या दुसर्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. सोन्याचा दर 48200 रुपयांच्या वर कायम आहे. सोने आज 84 रुपयांनी वाढून 48,255 रुपयांवर व्यवहार करताना दिसून आले. तर चांदीची किंमत सुद्धा वाढली आहे. आज चांदीच्या दरात 0.19 टक्केची वाढ झाली आहे. ज्यानंतर चांदी आज 62 हजार 420 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. (Gold Price Today)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 47 हजार 610 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 51 हजार 910 रुपये चुकवावे लागतील. तर दिल्लीत चांदी खुप महाग झाली. आज एक किलोग्रॅम चांदीचा दर 62 हजार 500 रुपये आहे. तर काल 1 किलो चांदीची किंमत 62 हजार 300 रुपये होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किती वाढले सोन्या-चांदीचे दर?
सोने-चांदीचे दर दिवसात दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी जारी केले जातात. सोमवारच्या तुलनेत सर्वप्रकारच्या शुद्धतेच्या सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने कालच्या तुलनेत आज 84 रुपयांनी महाग झाले. (Gold Price Today)
995 शुद्धतेच्या सोन्याचा काल सायंकाळचा दर 47978 रुपयांनी वाढून आज 48062 रुपयांवर पोहचला. हे सुद्धा कालच्या तुलनेत आज 84 रुपये महागले आहे. 916 शुद्धतेचे सोने 77 रुपयांनी महागले आहे. 750 शुद्धतेचे सोने 63 रुपयांनी महाग झाले. 585 शुद्धतेचे सोने 49 रुपयांनी वाढले. एक किलो चांदीची किंमत 689 रुपये वाढली आहे.
Web Title : Gold Price Today | gold price latest gold became expensive again today know what is the price of 10 grams
Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी