बहुजननामा ऑनलाइन टीम – Pankhuri Shrivastava | ग्रॅबहाऊसच्या संस्थापक पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) यांचे अवघ्या 32 व्या वर्षी निधन (Died) झाल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या कमी वयात उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतलेल्या पंखुरी यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 24 डिसेंबर रोजी पंखुरी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान, निधनापुर्वीची सोशल मीडिया पोस्ट आता समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) झांसी येथे राहणाऱ्या पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) वयाच्या 25 व्या वर्षी झासीहून मुंबईत (Mumbai) दाखल झाल्या. या ठिकाणी त्यांना भाड्याने घर घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. ब्रोकर्सना खूप पैसे द्यावे लागल्यानंतर त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना आली. यावरून जी घर शोधण्यात लोकांना मदत करेल अशी कंपनी त्यांनी सुरु केली होती. दरम्यान, त्यांनी 20 हजार रूपयांच्या भांडवलावर ग्रॅबहाऊसची (Grabhouse Company) सुरूवात केली होती. या कंपनीची वर्षाची उलाढाल 720 कोटीपर्यंत पोहोचली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Is it just me or has it become really hard to evaluate a candidate's potential in 1 hour interview. All seem to have read the same articles, know the same hacks from companies that are doing well & almost talk the same language! Are ref checks the only way?
— Pankhuri Shrivastava (@pankhuri16) December 23, 2021
दरम्यान, निधनाच्या आधी एक दिवस म्हणजे 23 डिसेंबर रोजी पंखुरी यांनी ट्विटच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती. ‘एका तासाच्या मुलाखतीत एखाद्या उमेदवाराच्या क्षमता आणि त्याचे मुल्यांकन करणे कठीण आहे. सर्वच उमेदवारांनी एकसारखे लेख वाचले. त्यामुळे चांगले काम करणार्या आणि सारख्या भाषा बोलणार्या कंपन्यांकडून सारख्याच गोष्टी जाणून घेतल्यासारखे वाटले. असे म्हणत रेफ चेक हा एकमेव मार्ग आहे का? असा सवालही पंखुरी यांनी उपस्थित केला होता.
Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू