तल अवीव : वृत्तसंस्था – इज्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू बुधवारी सार्वत्रिक निवडणूकीत (Israel election result 2019) सरकार बनवण्यासाठी आवश्यक बहुमतांपासून दूर दिसत आहेत. ते सत्तेवर आपली एक दशक जुनी पकड कायम ठेवू शकतील का ? अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे. जाणकारांच्या मते नेतन्याहू जर सत्तेतून बाहेर पडले तर याचा परिणाम भारत-इज्रायल संबंधावरही दिसू शकतो. नेतन्याहूंच्या कार्यकाळात इज्रायलने अनेक प्रसंगी भारताला खुलेआम साथ दिली आहे. सोबतच भारताने इज्रायलसोबत संरक्षणाचे अनेक करारही केले आहेत. पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या चांगली मैत्री आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर अनेकदा त्यांनी आपली मैत्री दाखवून दिली आहे.
हारित्ज वृत्तपत्राने केंद्रीय निवडणूक समितीच्या हवाल्याने सांगितले की, 91 टक्के मतदान झाल्यानंतर, नेतन्याहूंच्या मध्य-दक्षिणी लिकुड पार्टीला 31 जागा मिळाल्या आहेत. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी बेनी गॅन्ट्झ यांच्या ब्लू अँड व्हाईट पार्टीने 32 जागा मिळवल्या आहेत. दोन्ही पक्ष दक्षिणपंथी समूह आण मध्यमार्गी व वाम समूह120 सदस्यीय संसदेत सरकार बनवण्यासाठी आवश्यक 61 जागांपासून दूर आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणावाचा मध्यपूर्व वर मोठा प्रभाव पडू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, यांचे जवळचे सहयोगी नेतन्याहू पंतप्रधान बनले तर ते फिलिस्तीनला घेऊन त्यांची कठोर भूमिका ते कायम ठेवतील. नेतन्याहू इज्रायलचे दीर्घकाळ राहिलेले पंतप्रधान आहेत. ते 10 वर्ष हे पद काबिज करून आहेत.
दुसरीकडे, ब्लू अँड व्हाईट पार्टीचे नेते बेनी गॅन्ट्झ यांनी एक चांगलं सरकार आणि एका सामाजिक सुसंवादाच्या जोरावर निवडणूक प्रचार केला होता. गँट्झ हे देशाचे माजी ‘आर्मी चीफ ऑफ स्टाफ’ आहेत. इज्रायली सुरक्षा कायम राखताना फिलीस्तानसोबतच शांतीपूर्ण मार्गाने पुढे जाण्याचं त्यांनी म्हटलं होतं.
- दम्याचा आजार आहे का? ‘ही’ पाच योगासने केली तर दमा राहिल दूर
‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा - ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- प्रेग्नेंसीवर ‘याचा’ होतो परिणाम! कारणे जाणून घेतली तर घेऊ शकता योग्य काळजी
- ‘या’ सामान्य आजारांकडे पुरुषांनी दुर्लक्ष करू नये, असू शकतात मोठ्या रोगांचे संकेत
- तिशीनंतर ‘बल्जिंग डिस्क’ची शक्यता,अनुष्का शर्मा सुद्धा होती त्रस्त