नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | देशभरात अनेक शेतकरी, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेच्या दहाव्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. हा हप्ता 15 ते 16 डिसेंबरपर्यंत येईल असा अंदाज होता, परंतु तो न आल्याने अनेकांच्या मनात विविध शंका निर्माण झाल्या आहेत. मागील वर्षीप्रमाणे 10 हप्ता 25 डिसेंबरला येईल, असे अनेकांना वाटत आहे.
अजूनपर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत (PM KIsan 10th Installment) घोषणा केलेली नाही. केंद्र सरकार शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावाही केला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मोदी सरकारच्या (Modi Government) पीएम किसान सम्मान निधी योजनेत (PM Kisan) या महिन्यापर्यंत अगोदरपासून पाच बदल करण्यात आले आहेत. सहावा बदल मागील आठवड्यात करण्यात आला. ज्या अंतर्गत आता लाभार्थ्यांसाठी e-KYC करणे आवश्यक केले आहे. तुम्ही या योजनेशी संबंधीत कोणत्याही प्रकाराची माहिती PM Kisan Yojna च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वरून घेऊ शकतात.
ज्या शेतकर्यांनी आपले e-KYC केलेले नाही, त्यांना 10 हप्त्याचे पैसे मिळणार नाही.
शेतकर्यांच्या स्टेटसमध्ये अजूनपर्यंत Rft Signed by State For 10th Installment दिसत आहे. यामध्ये Rft चा अर्थ आहे, राज्य सरकार द्वारे लाभार्थ्यांच्या डाटाची तपासणी केली आहे.
आता केवळ FTO (Fund Transfer Order) जनरेट होणे बाकी आहे. ज्यामुळे पूर्ण हप्ता थांबू शकतो.
Web Title :- PM Kisan | pm kisan samman nidhi yojana when will be the 10 installment of this scheme credited in farmers account
ST Workers Strike | संप करणार्या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब