पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – घरी आलेल्या नातेवाईकाने केलेला विनयभंग आणि त्यानंतर करीत असलेल्या अश्लिल मेसेजमुळे एका तरुणीने घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी गौरव सोपान नारखेडे (वय ३०, रा. सिडको, औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या जवळच्या नात्यातील गौरव नारखेडे हा एप्रिल २०१८ मध्ये औरंगाबादहून त्यांच्या घरी सुट्टीसाठी रहायला आला होता. यावेळी त्याने घरात कोणी नसताना फिर्यादी यांच्या मुलीच्या खासगी भागास स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. मात्र, ही गोष्ट त्यांच्या मुलीने कोणाला सांगितली नव्हती. त्यामुळे आणखी निरढावलेल्या गौरव याने फिर्यादीच्या मुलीला अश्लिल मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रासलेल्या त्यांच्या मुलीने ६ डिसेंबर २०२० रोजी राहत्या घरातील गॅलरीमधून उडी मारुन आत्महत्या केली.
आत्महत्येमागील कारणे शोधताना हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी गौरव नारखेडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.