बहुजननामा ऑनलाइन टीम – व्याजाने घेतलेले 23 लाख रुपये दे (23 lakh with interest)नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी (Threaten) देवून शिवीगाळ करीत तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beaten) केली. ही घटना बावधन येथे घडली असून हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वर एकनाथ दगडे, सूरज हरिश्चंद्र पडवळ, मयूर प्रकाश वेडे (सर्व रा. बावधन) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्वास कैलास दगडे (रा. बकाजी कॉर्नर, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून शनिवारी (दि.14) रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून पैशांची मागणी करत मारहाण केली.
व्याजाने घेतलेले 23 लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी फिर्यादीला धमकी देत शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दरवाजावर लाथा मारत जिवे मारण्यी धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.