बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय पोस्टाने ग्राहकांसाठी पेमेंट अॅपची महत्वाची (India Post Payment Bank)सेवा दिली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने पोस्ट विभागासोबत मिळून मंगळवारी डिजिटल पेमेंट अॅप डाक पे लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांची सुविधा प्राप्त होईल. या पेमेंट अॅपला युपीआयशी जोडले गेले आहे. ज्याचा अर्थ आहे की, ग्राहक डाक पे च्या माध्यमातून गुगल पे, फोन पे आणि दुसर्या पेमेंट अॅप्सप्रमाणे डिजिटल व्यवहार करू शकतील. डाक पे ची काही खास वैशिष्ट्य जाणून घेवूयात…
डाक पे च्या माध्यमातून ग्राहक डोमेस्टिक मनी ट्रान्सफर (डीएमटी), क्यूआर कोड स्कॅन करून आणि युपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करू शकतात. या पेमेंट अॅपद्वारे यूजर घरबसल्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. या अॅपच्या माध्यमातून यूजरला पोस्टाच्या उत्पादनांच्या सेवा सुद्धा ऑनलाइन मिळतील.
या पेमेंट अॅपच्या माध्यमातून यूजर कोणत्याही बँक खात्यातून आपल्या आयपीपीबी खात्यात पैसे पाठवू शकतात. सोबतच एखाद्या दुसर्या खातेधारकाकडून पैसे प्राप्त करण्यासाठी ठिक अशाच प्रकारे रिक्वेस्ट पाठवू शकतात, जसे की, गुगल पे इत्यादी पेमेंट अॅप्समध्ये पाठवली जाते. ग्राहक किरकोळ दुकानांवर केलेल्या आपल्या खरेदीचे सहज पेमेंट करू शकतील.
ग्राहक डाक पे अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून थेट अकाऊंटमध्ये पेमेंट करू शकतात. सोबतच या अॅपच्या माध्यमातून पेन्शनधारक आयपीपीबीद्वारे सुरू करण्यात आलेल्या डीएलसी सेवेचा सुद्धा लाभ घेऊ शकतात. या अॅपद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात मदत होईल.