पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पहिल्या पत्नीचा मृत्यु झाल्याचे सांगून तिघींसोबत संसार थाटणाऱ्या चऱ्होलीतील लखोबा लोखंडे याच्यावर भोसरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पंडीतराव ऊर्फ तात्यासाहेब बाबुराव तापकीर (वय 60, रा. चर्होली बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. तापकीर याने एका महिला पोलिसाची देखील फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2013 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत नवी सांगवी, चाकण, फुरसुंगी घडला आहे. आरोपी व्यक्तीने त्याची पहिली पत्नी मयत झाली आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत 2014 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्याने आणखी दोन महिलांसोबत लग्न केले. त्यामध्ये एका पोलीस महिलेचा देखील समावेश आहे. फिर्यादी महिलेच्या परस्पर विवाह करुन तिची फसवणूक केली.
लग्नाच्या आगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा लैंगिक छळ केला. तसेच फिर्यादी महिलेला आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम हे करीत आहेत.