पिंपरी न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Crime News | तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आळंदी पोलिसांनी (Alandi Police) त्याची पत्नी, सासू, सासरे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा (Pimpri Crime News) दाखल केला आहे. स्रेहल योगेश शिंदे, विजया चंद्रकांत माने, चेतन चंद्रकांत माने, सुमन किरण माने, किरण महादेव माने, अभिजित किरण माने आणि बिल्डर मेहता (mehta builder) अशी गुन्हा दाखल (Pimpri Crime) झालेल्यांची नावे आहेत.
योगेश विलास शिंदे (वय ३६, रा. तनिष्क सावली सासोयटी, चर्होली) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सुखदेव विलास शिंदे (वय ३५, रा. धनकवडी) यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. योगेश शिंदे यास घरगुती तसेच पती पत्नीच्या भांडण्याच्या कारणावरुन त्रास दिला जात होता. तसेच तनिष्क सावली सोसायटीचा चेअरमन असताना त्याच्याकरवी फ्लॅटधारकांकडून बिल्डिंगचे खाली गाड्यांकरीता पार्किंगची सोय करुन देतो, असे म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते. तथापी बिल्डरने पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाही. त्याचा मानसिक त्रास (Mental distress) होऊन योगेश याने राहत्या घरी २६ जून रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Web Title : Pimpri Crime News | 7 people, including builder Mehta, charged with inciting suicide; The deception was made by saying that the parking facility
Pune Crime News | हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक