पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 130 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 4 हजार 983 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 130 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 118 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 53 हजार 030 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 1202 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 80 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1122 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.19) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 5 हजार 155 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 33 लाख 79 हजार 053 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona Update | 130 new corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक
Multibagger Penny Stock | 10 पैशांवरून 590.45 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, दिला 5 लाख टक्के जबरदस्त रिटर्न, 1 लाख रुपयांचे झाले 59 कोटी
Maharashtra Police | ‘वसुली’ प्रकरणात 2 ‘बड्या’ पोलिस अधिकार्यांना अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरार; राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ