बहुजननामा ऑनलाइन टीम – Chitra Wagh | औरंगाबादमधील वैजापूर (Vaijapur) येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे (Shivsena MLA Ramesh Bornare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रमेश बोरनारे यांनी महिलेला मारहाण केली आहे. संबंधित महिला ही बोरनारे यांची भाऊजय असल्याची माहिती समजत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीण आहे, अशा शब्दात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
आज म्हणे महिलाधोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण केलायं..
त्याचं
शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे ने भाजप च्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली..गुन्हा दाखल पण कारवाई शुन्य
उलट आज पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल…(१/२) pic.twitter.com/iqqvbAnb9t— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 19, 2022
शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली ? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पीडितेवरचं ॲट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ?, अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात ?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ज्या महिलेला मारहाण झाली त्या भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचं तक्रारीमध्ये सांगण्यात आलं आहे. यावर रमेश बोरनारे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Chitra Wagh | shivsena mla ramesh bornare beating for sister in law jayashree bornare chitra wagh said
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update