Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | Number of active patients increases in Pimpri Chinchwad ! Diagnosis of 59 patients of Corona in last 24 hours, find out other statistics

पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन   – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 59 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 2600 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 59 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 23 लाख 67 हजार 388 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 78 हजार 823 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 46 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 607 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

सध्या शहरामध्ये 423 सक्रिय रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 214 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 209 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 4524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona | Number of active patients increases in Pimpri Chinchwad ! Diagnosis of 59 patients of Corona in last 24 hours, find out other statistics.

 

ST Workers Strike | 200 एस.टी. कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’