पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (शुक्रवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 136 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 136 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 992 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 426 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
शहरात 857 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 857 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona)
दिवसभरात 18,048 जणांचे लसीकरण
शुक्रवारी (दि.1) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 18 हजार 048 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 19 लाख 68 हजार 118 जणांना लस देण्यात आली आहे. (Pimpri Corona)
Web Title : 136 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics
Uddhav Thackeray | … म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई
Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण
LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…
Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’
Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार