पिंपरी/ पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढीचा वेग कायम असून आज दिवसभरात 689 नवी रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या दहा हजार पार झाली आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10446 एवढी झाली आहे. शहरात आज दिवसभरात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 रुग्ण शहरातील तर दोन शहराबाहेरील आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 656 रुग्ण हे शहरातील आहेत. तर 33 रुग्ण हे शहराबाहेरील आहेत. या रुग्णांसह 259 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या शहरातील 38 रुग्णांवर पुणे शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 580 रुग्णांची दुसरी कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 6480 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरामध्ये 2993 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकाच दिवशी शहरात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 226 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 175 तर शहराबाहेरील 51 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण आकुर्डी, पिंपरी, काळेवाडी, चिंचवड, संततुकारामनगर, भोसरी, निगडी, खेड, खडकी येथील आहेत.