स्कॉटलैंड (ग्लासगो) : वृत्तसंस्था – कामाच्या वेळेत नशा करणे दोन वैमानिकांवर चांगलेच भारी पडले आहे. विमान उड्डाण घेण्याच्या काही वेळ आधी इंटरनॅशनल प्लाईट चे दोघे वैमानिक दारूच्या नशेत आढळले. हि घटना समोर येताच फ्लाईट रद्द करून त्या दोघांना अटक करण्यात आली. हि घटना स्कॉटलैंड येथील ग्लासगो येतील विमानतळावर आढळून आली.
युनाइटेड ऐरलाइन्स ची ग्लासगो ते न्यू जर्सी हि शनिवारी जाणारी फ्लाईट रद्द करण्यात आली. विमानाचे दोन्ही वैमानिक अल्कोहोल टेस्ट दरम्यान अयशस्वी ठरले. एअरलाइन कडून क्रू उपलब्ध नसल्याने फ्लाईट कॅन्सल झाल्याचे कारण सांगण्यात आले.
अटक झालेल्या वैमानिकांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दोन्ही वैमानिकांचे वय ६१ आणि ४५ आहे. त्यांना त्यांच्या या कृत्यासाठी २ वर्षे कारावास देखील होऊ शकतो. सोशल मीडिया वर या घटनेबाबत प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना विमानतळावर तासभर रेंगाळत ठेवण्यात आले.
गलसगो एअरपोर्टवर अशीच एक घटना ३ वर्षांपूर्वी देखील घडली होती. दोन्ही वैमानिकांना नशेच्या अवस्थेत विमान उड्डाण करताना पकडण्यात आले होते. त्यासाठी त्यांना १५ महिने आणि १० महिन्यांची शिक्षा मिळाली होती.
शनिवारी घडलेल्या घटने बद्दल पोलिसांनी सांगितले, दोन्ही वैमानिक कस्टडी मध्ये आहेत.