बहुजननामा ऑनलाईन टीम – सुट्टीवर आलेल्या सैन्य दलाच्या जवानाला उत्तर प्रदेश पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये कोंडून त्याची रात्रभर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या जवानाला रस्त्यावरून पकडून नेऊन त्याला मारहाण केली. हा सैनिक सध्या इंडियन आर्मीमध्ये लांस नायक या पदावर आहे. त्यामुळे सैन्यातील लांस नायकच्या अटकेबाबत पोलीस ठाण्यात वकिलांनी तोडफोड केली.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बाराबंकी येथील पोलीस स्टेशन परिसरात इंडियन आर्मीमध्ये असणारे लांस नायक संदीप कुमार हे मोटायसायकलवरून आपल्या २ मित्रांसोबत घरी जात होते. तेव्हा बाराबंकी पोलिसांनी गस्त घालत असताना त्याला रस्त्यात पकडले आणि खूप मारहाण केली. एवढच करून त्यांनी त्याला सोडून दिल नाही, तर ते त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि तिथेही त्याला खूप मारहाण केली. असे या जवानाने सांगितले आहे.
या जवानाने आपला परिचय पोलिसांना दिला. हे ऐकून तर पोलिसांनी त्याला अजून मारले आणि तुमच्या सारख्या लोकांना तर अजून मारले पाहिजे असं सांगून तर त्याला अजून मारले. असे त्या जवानाने सांगितले. अटक केल्यानंतर पोलीस जेव्हा या जवानाला कचेरीत पोहचले. तेव्हा वकिलांनी एकत्र येऊन खूप गोंधळ घातला. वकिलांनी पोलिसांवर आरोप केला की पोलिसांनी या जवानाला काही कारण नसताना अटक करून मारहाण केली आहे.
या प्रकरणाबाबत बाराबंकी वरिष्ठ पोलीस अधिकारी आर. एस. गौतम म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या आवारात काही लोक गोंधळ करत होते. तिथे पोलीस पोहचल्यावर ते लोक पोलिसांशी नीट बोलले नाहीत त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडले आणि योग्य ती कारवाई केली.