नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक फेब्रुवारी म्हणजे आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थ संकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डीझेलच्या किमतीत कपात केली आहे.पेट्रोल-डीझेलच्या दरात 5 ते 8 पैसे प्रती लीटर कपात झाली आहे. शुक्रवारी पेट्रोलचे दर 9 पैसे आणि डीझेलचे दर 8 पैसे प्रती लीटरने घटले होते. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 73.19 रुपये झाला आहे. तर एक लीटर डीझेलसाठी 66.22 रुपये मोजावे लागत आहेत.
चार महानगरातील पेट्रोल-डीझेलचे दर
आयओसीच्या वेबसाइटवर जारी दरांनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 73.19 रुपये प्रती लीटरवर आले आहेत. तर, डीझेलची किंमत घसरून 66.22 रुपये प्रती लीटर झाली आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 78.83 रुपये प्रती लीटर आहे.तर, डीझेलची किंमत 69.42 रुपये प्रती लीटर आहे.
याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल 75.85 रुपये प्रती लीटर, डीझेल 68.59 रुपये प्रती लीटर आहे. दक्षिण भारतातील प्रमुख शहर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.03 रुपये प्रती लीटरवर आले आहेत. याशिवाय डीझेलची किमत 69.96 रुपये प्रती लीटर आहे.