नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे जीओ ,एरटेल, आयडिया सारख्या कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या रकमेत वाढ केली आहे. ही वाढ डिसेंबर महिन्यापासून करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मात्र सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने मात्र दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीएसएनएल सध्या आपल्या ग्राहकांना जुन्या किंमतीमध्येच काही बेस्ट प्लॅनची ऑफर देत आहे. या प्लॅन्समध्ये दररोज तब्बल 5जीबीपर्यंत डेटा दिला जातो. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत
अनलिमिटेड डेटा प्लॅन
बीएसएनएलच्या वेबसाइटवर हा प्लॅन अनलिमिटेड डेटा असलेला प्लॅन असल्याचं म्हटलंय. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात.कंपनीकडून युजर्ससाठी डेटा कॅपिंग नसलेला प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 1,098 रुपये असून 84 दिवस वैधता आहे. या प्लॅनमध्ये एकूण 375जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात इंटरनेट डेटा मर्यादा नाहीये.
दररोज 5जीबी डेटा
अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी बीएसएनएलचा हा प्लॅन बेस्ट पर्याय आहे. या प्लॅनमध्ये दररोज 5जीबी डेटा दिला जात आहे. 548 रुपयांच्या या PRBSTV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर)मध्ये 90 दिवसांची वैधता आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होतो. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळत नाहीत.
3जीबी डेटाचा प्लॅन
दररोज 3जीबी डेटासाठी बीएसएनएलच्या 78 रुपयांच्या प्लॅनद्वारे रिचार्ज करता येईल. 8 दिवस वैधता असलेल्या या डेटा STV मध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी दररोज 250 मिनिट मिळतात. याशिवाय व्हिडीओ कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये EROS Now एंटरटेनमेंट सर्व्हिसचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.