नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अर्थसंकल्पापूर्वीच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात विक्रमी 224.98 रुपयांची वाढ झाली आहे. व्यवसायिकांना आता कमर्शियल सिलेंडरसाठी 1550.02 रुपये मोजावे लागतील. वाढलेले दर शनिवारी सकाळपासून लागू झाले आहेत.
तर, घरगुती स्वयंपाकाच्या गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मागील पाच महिन्यांपासून लागोपाठ वाढणार्या दराला यावेळी ब्रेक लागला आहे. मासिक रेट रिव्हिजनमध्ये घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) च्या बाजार भावात कोणताही बदल झालेला नाही. फेब्रुवारी महिन्यातही लोकांना हा (14.2 किलो) सिलेंडर 749 रुपयांना मिळणार आहे. ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपयांचे अनुदान जमा होईल.
सिलेंडर दर
14.2 किलो – 749.00 रुपये
19 किलो – 1550.02 रुपये
मागील तीन महिन्यात गॅस सिलेंडरचे दर
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019
14.2 किलो 749.00 रुपये 730.00 रुपये 716.50 रुपये
19 किलो 1325.00 रुपये 1295.50 रुपये 716.50 रुपये
5 किलो 276.00 रुपये 269.00 रुपये 264.50 रुपये
12 सिलेंडरवर अनुदान देते सरकार
सध्या सरकार एक वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोग्रामचे 12 सिलेंडरवर अनुदान देते. जर यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असल्यास ते बाजार दराने खरेदी करावे लागतात. परंतु सरकार प्रत्येक वर्षी 12 सिलेंडरवर जे अनुदान देते, त्याची किंमत सुद्धा महिन्याने बदल असते. सरासरी अंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विदेशी विनिमय दरामध्ये बदल यावर अनुदानाची रक्कम ठरते.