नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs 2021) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2021) पदभरती केली जाणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पदासाठी होणार भरती
पेटीएम 20 हजार फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह (field sales executives) नेमणूक करण्याचा विचार करत आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार (Promoting digital products) करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी (Technology) समजणाऱ्या तरुणांची गरज कंपनीला आहे.
कोण करु शकतो अर्ज
ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत असे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अॅप वापरुन अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे दुचाकी आहे अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.
एवढी मिळणार सॅलरी
निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे. यानुसार लवकरच ही भरती होणार आहे.
Web Title : Paytm Jobs 2021 | paytm will open 20 thousands jobs after diwali for youth
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’