नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही संध्याकाळी खरेदीसाठी बाजारात गेलात आणि दुकानात सामान घेत असताना तुम्हाला ८ फूट उंच अजगर दिसला तर तुमची अवस्था काय असेल. असाच प्रकार यूपीच्या प्रयागराजमध्ये घडला आहे. येथे घूरपूर भागातील एका दुकानात महाकाय अजगर दिसल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
त्याला पाहून दुकानातील लोक घाबरून गेले आणि पळून जाऊ लागले. ही बातमी बाजारात पसरताच अजगराला पाहण्यासाठी दुकानात लोकांची गर्दी जमली. फळाच्या दुकानावर प्रचंड मोठा अजगर पाहून लोकांनी त्वरित वनविभागाला कळविले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
सुमारे तासभर मेहनत व जोखमीनंतर लोकांनी त्याला पकडून वनविभागाच्या टीमकडे सोपवले. दुकानातून साप बाहेर येण्याची ही पहिली घटना नाही याआधीही उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये अनेकदा दुकानातून साप बाहेर आले आहेत.
Visit : bahujannama.com