बहुजननामा ऑनलाईन टीम : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हंगेरितील माजी जिम्नास्ट जोल्ट बोर्काई सेक्स स्कँडल मध्ये अडकले आहते. यासंबंधित व्हिडिओ इंटरनेटवर वायरल झाला आहे. ५४ वर्षीय जोल्ट ग्योर शहराचे महापौर देखील आहेत. वास्तविक, त्यांचा हा व्हिडिओ एका अश्लील वेबसाइट अपलोड केला गेला आहे.
व्हिडिओमध्ये, जोल्ट बोर्काई ड्रग्स घेताना आणि तरुण महिलांशी बॉन्डिंग करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ लीक झाल्यानंतर, जोल्डने या प्रकरणात आपण सहभागी असल्याचे नाकारले , परंतु नंतर त्याने आपली चूक कबूल केली. मात्र, त्यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. जोल्ट यांनी पलटवार करत असा दावा केला की, हे सर्व निवडणुकीत त्याच्या प्रतिमेला डाग देण्यासाठी केले गेले आहे. हंगेरीमध्ये रविवारी महापौर पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. जोल्टने त्यांच्या कृत्याबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.
पत्नी आणि मुलांसमवेत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये, बोल्ट बोर्काई एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, ‘माझ्या या व्हिडिओमध्ये छेडछाड केली गेली आहे. दरम्यान, मी मुलींशी असलेले संबंध नाकारणार नाही. त्याचा हा व्हिडिओ पहिल्या ब्लॉगमध्ये लिक झाला होता. ज्यामध्ये हे सांगण्यात आले होते की जोल्टचा हा व्हिडिओ क्रोएशियाच्या डबरोविंगमधील एड्रियाटिक येथील आहे.
जोल्ट याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक फुटी पोस्ट केला आहे, ज्यात जोल्ट त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसमवेत आहे. त्यांनी कॅप्शन लिहिले- ‘आम्ही एकत्र आहोत, चांगला वेळ असो किंवा वाईट’. १९८८ च्या सिओल ऑलिम्पिकमध्ये जॉल्टने सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे लैंगिक गैरव्यवहारात अडकलेल्या असूनही माजी ऑलिम्पिक चॅम्पियन जोल्टने महापौरपदाची निवडणुकीत बाजी मारली मंगळवारी त्यांनी सत्ताधारी फाइड्ज पार्टी सोडली. ते म्हणाले की, ते स्वतंत्रपणे महापौर म्हणून काम पाहतील.
Visit : bahujannama.com