नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतर कागदपत्रांइतकेच महत्त्वाचे असणारे पॅन कार्ड व्हेरीफाय करणे आता खूप सोपे झाले आहे. हे व्हेरीफेकेशन आता ऑनलाईन केलं जाऊ शकतं. पॅन कार्ड धारक स्वत: हे व्हेरिफिकेशन करू शकतात. यासाठी आयकर विभागातही जाण्याची आवश्यकता नाही. आयकर विभागाच्या ई फायलिंग वेबसाईटवर जाऊन तुम्ही पॅन कार्ड व्हेरिफाय करू शकता.
‘असं’ करा ऑनलाईन पॅन कार्ड व्हेरिफिकेशन
1) सर्वात आधी आयकर विभागाची ई फायलिंग वेबसाईट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा. इथे लॉग करा.
2) माय प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा. इथे पूर्ण नाव, जन्मतारीख, पॅन नंबर, अशी विचारलेली सर्व माहिती भरा.
3) आता तुम्हाला तुमच्या पॅनचं स्टेटस भरावं लागेल.
4) सर्व माहिती भरल्यानंतर तु्म्हाला कॅप्चा कोड भरयचा आहे. यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
5) आता तुम्हाला तुमचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन स्टेटससहित दिसेल.
तीन प्रकारे होतं ऑनलाईन पॅन कार्ड व्हेरिफिकेशन
1) फाईल- बेस्ड पॅन कार्ड व्हेरिफिकेशन- या प्रकारचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन हे अनेक संस्था आणि सरकार द्वारा केलं जातं. यात एकाच वेळी 1000 हून अधिक पॅन कार्डचं व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं.
2) स्क्रीन बेस्ड पॅन कार्ड व्हेरिफिकेशन- या प्रकारात एकाच वेळी 5 पॅन कार्ड व्हेरिफाय केले जाऊ शकतात.
3) सॉफ्टवेअर (API) बेस्ड पॅन कार्ड व्हेरिफिकेशन- यात सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनचा उपयोग करून तुम्ही पॅन कार्ड व्हेरीफाय करू शकता.
Visit : bahujannama.com