बहुजननामा ऑनलाईन – बिग बॉस हा एक टीव्ही शो आहे ज्यामध्ये काहीही घडू शकते. वादापासून ते मोठ्या लढाई आणि अचानक सुरु होणाऱ्या लव्ह स्टोरीपर्यंत या शोमध्ये काहीही शक्य आहे. या शोमध्ये येणारा कलाकार त्याच्यामध्ये होणारे वाद आणि धक्कादायक खुलासे यासाठी जास्त चर्चेत असतात. आता मात्र हा शो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. तो म्हणजे स्पर्धकांना मिळालेल्या पैशांमधील फरक. काही स्पर्धकांना सामान्य किंमत दिली जाते, तर काहींना मोठी रक्कम देण्यात आली आहे. शो च्या विजेत्या स्पर्धकांपेक्षा जास्त पैसे मिळवणारे स्पर्धकही होते.
बिग बॉस च्या ११ व्या सीझनमधील हिना खानला पहिल्या दहा आठवड्यांसाठी १.२५ कोटी रुपये देण्यात आले होते, तर शिल्पा शिंदे यांना दर आठवड्याला सहा लाख रुपये दिले जात होते. तर शिल्पा शोमध्ये जिंकली तेव्हा शिल्पाला १.२९ कोटी रुपये तर हिनाला १.७७ कोटी रुपये मिळाले. शोच्या ९ व्या सीझनची रिमी सेनचा बिग बॉसच्या घरात शोची प्रसिद्धी वाढविण्यासाठी २ कोटी रुपये दिले जात होते. तर ४ च्या सीझनमधील श्वेता तिवारीला मोठी रक्कम मिळाली असली तरी रेसलर खली यांची जगभरातील प्रसिद्धी पाहता त्यांना आठवड्यासाठी ५० लाख रुपये दिले गेले.
त्यानंतर शोच्या ८ व्या सीझनमध्ये करिश्मा तन्ना जिंकू शकली नाही तरी तिला आठवड्याला १० लाख रुपये कमवत होती. ही रक्कम शोचा विजेता गौतम गुलाटीला मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्तच होती. बिग बॉस १० व्या सीझनमध्ये बीग बॉसच्या घरात राहण्यासाठी राहुल देव यांना २ कोटी रुपये देण्यात आले होते. तर शो ची फायनलिस्ट बानी जे ला १.५५ कोटी रुपये देण्यात आले होते तर विजेता ठरलेला मनवीरने बक्षिसामध्ये ४० लाख रुपये जिंकले. बिग बॉस ४ मध्ये पामेला अँडरसन पाहुणी म्हणून आली असली तरी तिला फक्त तीन दिवसासाठी अडीच कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.
Visit : bahujannama.com