बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानमधील नानकाना साहिबमध्ये शीख मुलीचे अपहरण आणि धर्मांतर केल्याच्या प्रकणावर कारवाई करत मुलीला तिच्या वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पंजाबचे मुख्यंमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुद्दा लावून धरत पाकिस्तानाचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर या प्रकरणाचा दबाव टाकला होता. याशिवाय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना हे प्रकरण आपल्या पाकिस्तानी समकक्षांकडे नेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, पाकिस्तानच्या नानकाना साहिबमध्ये शीख मुलगीचे अपहरण आणि धर्मांतर घडवण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोललो आहे.
जबरदस्तीने धर्मांतर केल्यावर मुलीचे जबरदस्तीने मुस्लिम मुलाशी लग्न लावल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. मुलीच्या लग्नाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुलगी एका मुलाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. जगजित कौर असे या मुलीचे नाव असून ती कोणत्याही दडपणाशिवाय मुलाशी लग्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी